नाशिक मिरर : सातपूर येथील राधाकृष्णनगर मधील श्री रेणुकामाता मंदिराच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी देवीचा महाअभिषेक, दु. १२ वाजेनंतर महाप्रसाद, रात्री ७ ते १० वाजेपर्यंत ह.भ.प बाल कीर्तनकार खुशाली ताई उगले (आळंदीकर )यांचे समाज प्रबोधनकार कीर्तनाचे आयोजन केले आहे.

कार्यक्रमाचे आयोजन रेणुका माता सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ चे सर्व पदाधिकारी, सदस्य व वर्गणीदार यांच्या वतीने करण्यात आले असून,सामाजिक कार्यकर्ते तथा मार्गदर्शक  इंद्रभान सांगळे, अध्यक्ष कैलास चंदने, सुनील चव्हाण, भास्कर बोरसे, विलास सानप, भालचंद्र शिंपी,सजन पाटील, हनुमान आनप, डॉ.अनंत भदाणे,गोविंद ताडगे यांनी श्रमिकनगर, राधाकृष्णनगर, विष्णूनगर, अशोकनगर, विश्वासनगर व सातपूर मधील भाविकांना कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Don`t copy text!