नाशिक मिरर वेबटीम :

अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीत मटेरियलच्या लिफ्ट खाली दबुन सुरक्षा रक्षकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना दि.३ नोव्हेंबर च्या मध्यरात्री च्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यू ची नोंद केली आहे.
छोटू सुपडु खाटीक मयत सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.
या बाबत पोलिसांनी माहिती दिली की , अंबड औदयोगिक वसाहतीत प्लाट नंबर ई – ७४ युके मेटल प्रा. लिमिटेड या कंपनीत सोमवारी रात्री कंपनीतील मटेरियल डिस्पॅच च करण्याचे काम सुरू होते. यात रात्री दोन वाजेच्या सुमारास कंपनी च्या पहिल्या मजल्या वरून लिफ्ट ने मटेरियल खाली आणुन गाडीत भरत होते. कंपनीतील माल गाडीत भरून झाला. त्या नंतर रात्री दोन च्या सुमारास कंपनीतील सुरक्षा रक्षक
छोटू सुपडु खाटीक ( ६७ रा. दत्त नगर, चुंचाळे शिवार ) हे मटेरियल डिस्पॅच ठिकाणी गेले. व मटेरियल लिफ्ट च्या जागी जमिनीवर पेपर टाकुन झोपले असतांना, वरुन मटेरियल लिफ्ट खाली आली. यात लिफ्ट खाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली असून पुढील अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मारुती भड करीत आहेत. त्यांच्यावर मुळ गाव शिरपुर येथे अंत्यसेस्कार करण्यात आले.

बातम्या

Don`t copy text!