नाशिक मिरर वेबटीम : येथील कर्तव्य सेवाभावी सामाजिक संस्थेतर्फे सातपूर कॉलनी परिसरात सामाजिक उपक्रमांतर्गत दि ९ जाने रोजी सर्व जेष्ठ व बाळ गोपाळ,विद्यार्थी यांच्या समवेत नायलॉन मांजाची होळी करून ,नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ  देण्यात आली. व नायलॉन मांजा न वापरण्याचे आव्हान करण्यात आले. व परिसरात कोणी नायलॉन मांज्याचा वापर व विक्री करत असल्यास नागरिकांनी संस्थेच्या पदाधिकारीशि संपर्क साधावा असे आव्हान या वेळी करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जीवन रायते यांनी नायलॉन मांजा न वारण्याचे आव्हान केले. व लोकेश कटारिया यांनी लहान मुलांना मांजा मुळे होणारे नुकसान बाबत माहिती देऊन, परिसरातील नागरिकांना मांजा न वापरण्यावचे शपथ देण्यात आली.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जीवन रायते, अध्यक्ष हर्षेल आहेर, मार्गदर्शक मनोज अहिरे, राजाभाऊ भावसार, योगेश वाडेकर, संस्थेचे सचिव विकास सोनवणे, विकास रायते, उपाध्यक्ष ईश्वर घाटोळ, सदस्य दीपक जोशी, ज्ञानेश्वर जमदाडे, रोहीत शिरोडे, शरद सांगळे,मंगेश मटाले, अमोल दानेज,नरेंद्र पुनतांबेकार विजय महाजन, बिर्हाड काका, पोटे, पगारे आदी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!