नाशिक : प्रतिनिधी
आडगाव शिवारात घरफोडीत चोरट्यांनी पावणे दोन लाखाच्या ऐवज नेला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांसह रोख रकमेचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविता किरण थोरात (रा. प्रभात कॉलनी, शरायू पार्क) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. थोरात कुटूंबिय ३० ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातून सोप्याचांदीचे दागिणे व रोकड असा सुमारे १ लाख ७० हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.
—
