नाशिक मिरर :

येथील सातपूर कॉलनी मधील जिजामाता मनपा शाळा व मैदान परिसर लगत रस्त्याच्या कडेला घरासमोर पार्किंग केलेले तब्बल सात चारचाकी वाहने अज्ञात टवाळखोरानी फोडली.

याबाबत सविस्तर बातमी अशी की,बुधवार दि.१८ रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकानी परिसरात दहशत पसरविण्याच्या हेतूने सातपूर कॉलनी परिसरात राहणारे कृष्णा बोडके यांनी मंगळवारी टाटा मोटर्स कंपनी ची टियागो शोरूम गाडी विकत घेतली होती. व अन्य त्याचीच दुसरी चारचाकी कार सह जीवन जाधव, भगवान मोगल, व इतर नागरिकांच्या एमएच १५ डीएम १४६५ हुदाई eon , एमएच १५ एफव्ही २९७१ टाटा एस, एमएच १४ बीएक्स ४०५१, एमएच १५ बिडी १६०२ अल्टो, एमएच १५ जीएल ३१३९ टाटा टियागो, अशा एकूण सात चारचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले.

 

विशेष म्हणजे ओमकार ट्रॅव्हल्स कंपनी बस फोडून अजून महिना झाला नाही तर ही दुसरी घटना सातपूर परिसरात घडल्याने सातपूर व सातपूर कॉलनी परिसरात भीती वातावरण असून संशयित टवाळखोर समाजकंटकाचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी,परिसरात व मनपा च्या मोकळ्या मैदानावर टवाळखोर मुले रात्री उशिरापर्यंत आरडाओरडा व दहशत करीत उभे असतात अशा मुलावर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते मनोज आहिरे यांनी पोलीस आयुक्त व सातपूर पोलिस प्रशासनाने कडे केली आहे.

 

संशयीत टवाळखोर मुलांचा शोध सुरू आहे.टवाळखोर मुलावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांना कोणावर संशय असल्यास माहिती कळवावी. परिसरातील नागरिकांनी जागृत होऊन सीसीटीव्ही कॅमेरा बसवून घ्यावेत जेणेकरुन पोलिसांना तपास करण्यास मदत मिळेल. – महेंद्र चव्हाण, वरीष्ठ पोलीस निरीक्षक ,सातपूर

सातपूर कॉलनी परिसरात दुचाकी वर टवाळखोर मुले दहशत करीत फिरतात. अनेक ठिकाणी मध्यरात्री पर्यंत उभे असतात.सदर घटनेतील टवाळखोर समाजकंटकाचा शोध घेऊन पोलीस प्रशासनाने परिसरातुन त्याची धिंड काढावी व नागरिकांना दहशत मुक्त करावे.

– सलीम शेख ,मा.नगरसेवक

बातम्या

Don`t copy text!