नाशिक मिरर : वृत्तसेवा आरोग्य खात्यांतर्गत कुटुंबकल्याण आयुष्यमान भारत वैद्यकीय विमा योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत जिल्ह्यात १२ लाख ५६ हजार ४३६ पात्र लाभार्थी आहेत. यात आतापर्यंत पाच लाख २१ हजार ६५१ यामुळे जे राहिलेले लाभार्थी आहेत, लाभार्थीना आयुष्यमान कार्डचे वाटप करण्यात आले आहे.
अजूनही जिल्ह्यातील ६ लाख ४३ हजार ७८५ पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत.सातपूर विभागातील सातपूर कॉलनी मधील ३ हजार लाभार्थी या योजनेपासून वंचीत आहे.महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी आयुष्यमान भारत योजनेसाठी २०११ च्या सामाजिक, आर्थिक, जातनिहाय जनगणनेच्या यादीनुसार योजनेत त्याचे नाव समाविष्ट आहेत.त्याचे गोल्डन कार्ड (आयुष्यमान भारत)काढण्यासाठी मा. नगरसेवक सलीम शेख यांच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातपूर कॉलनी येथील कार्यालय मध्ये आरोग्य मित्राच्या सहकार्याने नोंदणी सुरू आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना च्या पर्यवेक्षीका सुवर्णा पाटील, आरोग्य मित्र अश्विनी महाले, एकनाथ तिरमाळी, गोरख पाटील , विकास पाडवी सदर नोंदणी साहाय्य करीत आहे. योजनेमध्ये प्रति कुटुंब ५ लाखापर्यंत १ हजार २०९ आजारावर नाशिकमधील संलग्नित हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळतील.
सातपूर कॉलनी मधील लाभार्थींनी आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड तयार करण्याच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी सातपूर कॉलनी येथील कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन मा. नगरसेवक सलीम शेख, योगेश लबडे, विजय उल्हारे, वैभव महिरे, सचिन सिन्हा यांनी केले आहे. यावेळी दीपक पाटील, विश्वनाथ धुळे, काशिनाथ देसले आदीसह जेष्ठ नागरिक योजनेचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते.
