नाशिक मिरर :  नाशिक जिल्हाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे.अनेकांवर ऑक्सिजन बेड, उपचारा अभावी मुत्यु ओढावला. प्रत्येक नागरिकाने परिवार व नातेवाईक मधील कोणाला ना कोणाला गमावले आहे. ही कोरोना मुळे झालेली हानी कधीही भरून न  निघणारी अशी आहे.

 

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या कमतरतेची खासदार हेमंत गोडसे यांनी गंभीर दखल घेऊन, जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटीकरण यावे या जाणीवेतून खासदार हेमंत गोडसे यांनी आज राज्य कामगार विमा महामंडळाच्या राज्य प्रशासनाची भेट घेतली. जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिकीकरणाचा विचार करून नाशिक शहरातील सातपूर येथील ईएसआय हॉस्पीटलची क्षमता आधिकाधिक सक्षम करण्यासाठी ईएसआयसी कार्पोरेशनने स्वत :कडे हस्तांस्तरण करून द्यावे, अशी आग्रही मागणी खा. गोडसे यांनी श्रम व रोजगार मंत्रालयाचे केंद्रिय मंत्री संतोषकुमार गंगावार यांच्यासह राज्य प्रशासनाकडे केली आहे. राज्य कर्मचारी विमा कापौरेशनच्या प्रशासनाने खा. गोडसे यांची मागणीला सकारात्मक दुजोरा दिला आहे.

 

खासदार गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गेल्या काही महिन्यांपूर्वी औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंजुरासाठी सिन्नर तालुक्यात तीस खाटांचे रुग्णालयाला मंजुरी देण्यात आली आहे. राज्य कामगार विमा विभागाच्या पथकाकडून गेल्या आठवड्यात प्रस्तावित रूग्णालयासाठी सिन्नर तालुक्यातील मोह आणि मुसळगाव येथे मोकळ्या भूखंडाची पाहणी करण्यात आली. आता रूग्णालय उभारणीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. या प्रस्तावित रूग्णालयामुळे तालुक्यातील औयोगिक क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांचा आणि त्यांच्या कुंटूबियांच्या आरोग्याचा प्रश्न बन्याच अंशी सुटणार आहे. सिन्नर पाठोपाठ आता खा. गोडसे यांनी विविध कंपन्यामंध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या तक्रारीची दखल घेत सातपूर येथील ईएसआय रूग्णालयाच्या अपुरा कर्मचारी वर्ग आणि सोयी -सुविधांचा अभाव या गंभीर समस्येकडेही लक्ष घातले आहे.

 

आज खासदार गोडसे यांनी मुंबईत जात राज्य कामगार विमा महामंडळाचे अतिरिक्त आयुक्त प्रणय सिंन्हा यांची भेट घेतली. कोरोना महामारी आपल्याला खूप काही शिकवून गेली असून यापुढे आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्याची गरज असल्याची भुमिका यावेळी खासदार गोडसे यांनी मांडली. भविष्यातील औद्योगिकीकरणाची वाढती व्याप्ती विचारात घेऊन आधुनिक आरोग्य यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत खासदार गोडसे यांनी सिंन्हा यांचे लक्ष सातपूर येथील ईएसआय रुग्णालयातील समस्यांकडे वेधले. सातपूर येथील ईएसआयच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी असून या हॉस्पिटलमध्ये सोयी -सुविधांचा तसेच अत्याधुनिक आरोग्य यंत्रणेचा अभाव आहे. परिणामी मजूर, कामगारांना आरोग्य सुविधांचा पुरेपूर लाभ मिळत नाही. यामुळे कामगार वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर असून पुणे, कोल्हापूरच्या धर्तीवर सातपूर येथील रुग्णालयाचे अधिकाधिक सक्षमीकरण करण्यासाठी सदर रूग्णालय इएसआयसी महामंडळाने स्वतःकडे हस्तांतरित करून घ्यावे, अशी आग्रही मागणी यावेळी खासदार गोडसे यांनी सिंन्हा यांच्याकडे केली आहे. यावेळी आर.के. अग्रवाल, अतिरक्ति कार्यकारी अधिकारी आशुतोष गिरी, विनायक बाकडे, आदी अधिकारी उपस्थित होते. या मागण्यांविषयीचे विशेष पत्र खासदार गोडसे यांनी केंद्रीय मंत्री गंगावार यांना पाठवले असून या मागणींची तड लावण्यासाठी पुढील आठवड्यात गंगावार यांची दिल्लीत भेट घेणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे.

 

Don`t copy text!