मुंबई : नाशिक मिरर वेबटीम राज्यात इयत्ता नववी ते बारावी शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. हा निर्णय घेताना खाजगी विना अनुदानित शाळेने चिंता व्यक्त करत शाळांनी खबरदारी घेताना शिक्षण विभागाने यासाठी निधी किंवा साहित्य पुरवावे अशी मागणी केली होती. खबरदारत्यामुळे राज्यातील स्थानिक प्रशासन म्हणजेच महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेकडून याची संपूर्ण जबाबदारी घेतली जाणार आहे.राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी परिपत्रक काढून महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांना सूचना करताना शाळेतील सर्व सोयी सुविधा शाळा सुरू होण्यापूर्वी उपलब्ध करून घ्याव्यात असं सांगितलं आहे. यामध्ये शाळा सुरू होताना शाळेचे सॅनिटाइजेशसाठी सॅनिटाइजर पुरवणे, विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गण, ऑक्सिमीटर व इतर साहित्य महापालिका पुरवणार आहे. त्यामुळे शाळांवरील जबाबदारी काही प्रमाणात कमी झाल्याने शाळाचालकांनी काहीसा सूटकेचा निःश्वास घेतला. सोबतच शिक्षकांना 17 नोव्हेंबरपासून 21 नोव्हेंबरपर्यत कोविड-19 RTPCR चाचणी सुद्धा स्थानिक प्रशासनाकडून मोफत व्यवस्था करून दिली जाणार आहे.

बातम्या

Don`t copy text!