उस्मानाबाद जिल्ह्यात छावाचे ढोल-ताशा गजरात आणि फटाक्यांची आतषबाजीत स्वागत!
नाशिक मिरर वेबटीम : उस्मानाबाद जिल्हा
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पाच शाखांचा उदघाटन सोहळा संस्थापक अध्यक्ष
करण गायकर यांच्या सह केंद्रीय व प्रदेश कार्यकारणी तील मुख्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला.नियोजित उस्मानाबाद जिल्हा दौऱ्याची सुरुवात ही भूम तालुक्यामधील शासकीय निवासस्थान येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन करण्यात झाली.
यानंतर तालुक्यातील वारे,वडगाव,दहिटने,घारगाव पाचपिंपळा या गावांमध्ये छावा क्रांतिवीर सेनेच्या शाखा फलकांचे अनावरण करून छोटेखानी कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.मेळाव्याची सुरुवात छत्रपती शिवराय व अन्य महापुरुष यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली.यानंतर संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष प्रतापसिंह कांचन पाटील यांनी मार्गदर्शन करताना संघटनेची ध्येयधोरणे याबद्दल माहिती दिली.मेळाव्याप्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी उपस्थित सर्व समाज बांधवांना सुरुवातीला संघटनेत असलेली काम करण्याची पद्धत, आजवर असलेले संघटनेचे कार्य,आपल्या गावात शाखा उदघाटन करण्याचा उद्देश याबाबत माहिती देत मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला व आज महाराष्ट्रात शेतकरी,कामगार,विद्यार्थी, मराठा आरक्षण याबाबत असलेल्या अडचणीं वर कशी मात करायची याबाबत मार्गदर्शन केले.
या सर्व कार्यक्रमा प्रसंगी संघटनेचे प्रदेश महासचिव शिवाजीराजे मोरे,प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ, प्रदेश संघटक अशोक चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष बाबा रोटे, प्रदेश प्रवक्ते जीवन राजे इंगळे,शेतकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष पंकज जऱ्हाड,मराठवाडा संपर्क प्रमुख अमर शेख,युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष महेश गवळी आदींसह भूम तालुका अध्यक्ष संतोष साळुंके,वाशी तालुकाअध्यक्ष योगेश कवडे, तुळजापूर तालुका अध्यक्ष औदुंबर जमदाडे,परांडा तालुका अध्यक्ष गौतम लटके,जिल्हा उपाध्यक्ष दत्ता बारमुळे, आकाश जेधे,अमोल लामकर,भाऊसाहेब लटके, रामदास सुरवसे,दत्ता नलावडे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
