कामगारांनी काळ्या फिती लावत दर्शवला पाठिंबा
नाशिक मिरर वेबटीम : केंद्र शासनाने लागू केलेल्या शेतकरी विरोधी धोरण व कायद्याविरोधात पुकारलेल्या भारत बंदला सातपूर औद्योगिक वसाहतीतील कारखाने व अत्यावश्यक सेवा वगळता सातपूरकरांनी शंभर टक्के बंद पाळत सहभाग नोंदवला.सातपूर -अंबड मधील औद्योगिक वाहतीमधील सर्व कंपन्या सुरू होत्या.परंतु बऱ्याच कंपन्यां मधील कामगारांनी काळ्या फिती लावून केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा विरोध केल्याचे दिसून आले. ईप्कोस कंपनी मधील कामगारांनी काळ्या फीती लावून केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला.
मंगळवारी  बहुतांश व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकानें बंद ठेवून बंद मध्ये सहभाग नोंदवला. नेहमी वर्दळीचे ठिकाण असलेले सातपूर भाजी मार्केट,मेनरोड परिसरामध्ये शुकशुकाट दिसून आला.
दरम्यान, सिटू संलग्न नाशिक वर्कर्सची युनियन असलेल्या विविध कारखान्यात कामगारांनी काळ्या फिती लावत तर काहींनी पहिली पाळी संपल्यानंतर प्रवेश द्वारावर निदर्शने करत बंद मध्ये सहभाग नोंदवला.सातपूर मधील सातपूर कॉलनी,कामगार नगर,जाधव संकुल,अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर अशा प्रमुख भागात देखील मेडिकल,दवाखाने, किराणा दुकान आदी वगळता बाकी व्यवसायिकांनी बंद सहभाग घेतलेला दिसून आला.भारत बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन बंदच्या पूर्वसंध्येला सोमवारी सायंकाळी सातपूर भारत बंद कृती समितीच्या वतीने व्यापाऱ्यांना करण्यात आले होते. सातपूर भारत बंद कृती समितीने सातपूर गावठाण परिसरात फिरत बंद मध्ये सहभाग होण्याची विनंती डॉ.डी.एल कराड , दौलत निगळ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक पश्चिम अध्यक्ष नितीन निगळ,आण्णासाहेब कटारे, शशी घाटोळ,  हेमंत मौले, विजय भंदुरे चेतन भंदुरे, रवी काश्मिरे ,त्र्यंबक भंदुरे, कांतीलाल भंदुरे, छगन भंदुरे, पाटील बाबा, ठोंबरे सर गोरक्ष सोनवणे, भिवानंद काळे, निलेश भंदुरे , व मच्छिंद्र भंदुरे ,रवी भंदुरे ,दीपक मौले, सुरेश  गोवर्धने,सुनील निगळ, सोमनाथ मौले,विलास घाटोळ आदी नी केली.

बातम्या

Don`t copy text!