नाशिक मिरर : मालेगाव
येथील पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावर सापळा रचून 40 किलोहून अधिक गांजा पकडला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गाने कारमधून गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे सकाळी पाटणे फाट्यावर सापळा लावण्यात आला. सुखसागर हॉटेलकडे जाणार्‍या रस्त्यावर संशयास्पद कार येताच ती अडविण्यात आली. या कारमध्ये 40 किलोहून अधिक गांजा मिळून आला. साधारण दोन लाख रुपयांचा हा माल आहे. तत्काळ चालकासह तिघांना अटक करण्यात आली. तहसीलदार सी. आर. राजपूत यांच्या उपस्थितीत पंचनामा केला गेला. तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, या कारवाईविषयी माहिती देण्यात आलेली नाही.

Don`t copy text!