मुंबई, दि. 12 : शासनाच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या विशेष मुलाखतीचे पुनः प्रसारण करण्यात येणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर गुरुवार दि.१३, शुक्रवार दि.१४ आणि शनिवार दि.१५ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शासनाला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षातील पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पर्यटन विभागाच्या कामकाजावर आधारित ही मुलाखत घेण्यात आली आहे. “माझी वसुंधरा” हे अभियान, या अभियानाचे स्वरूप, ग्लासगो येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत राज्याचा करण्यात आलेला गौरव, पर्यावरण व हवामान बदल रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग, कृषी पर्यटन, कॅरॅव्हॅन व कॅम्परव्हॅन ही नवीन संकल्पना, मुंबईचा पर्यटनदृष्ट्या विकास आदी विषयांची माहिती पर्यटन आणि पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

बातम्या

Don`t copy text!