मा.श्री लक्ष्मण निकम याची सामाजिक क्षेत्रात यशस्वी वाटचाल

नाशिक मिरर वेबटीम :
२०१४ साली शिर्डी येथे अंगाला शहारे आणणारी घटना घडली. शिर्डी मधील एका महिले वर अत्याचार झाला होतो.सदर घटना काळजाचा ठोका चुकवून गेला. आणि आपण दैनंदिन काम करीत असताना समाजाच देखील आपल्या प्रति काही तरी देणं लागत, ही बाब मनात पक्की केली.देशभरात,महाराष्ट्रात, नाशिक जिल्ह्यात ही आज ही महिला अत्याचार घटना घडत आहे.त्यामुळे आपल्याला शक्य होईल तितकी मदत पिढीत, असाह्य महिला ना मदत करायची हे ठरवून आपले काम सांभाळून सण २०१४ – १५ च्या मार्च महिन्यात रत्न कन्या सेवाभावी संस्था स्थापन केली. यामुळे महिलांना ‘हक्काचं व्यासपीठ मिळालं’ व नाशिक मध्ये एक मोठे सामाजिक काम उभे राहिले. हे सामाजिक उभे केले मा.श्री. लक्ष्मण विठ्ठलराव निकम या सामाजिक कार्यकर्ते यांनी.

त्यांना लहान पणापासून सामाजिक कार्य करण्याची आवड होती. शालेय शिक्षण घेत असताना देखील ते विविध सामाजिक कामात सहभागी होत असत. माझ्या परिचित व मला माहिती मिळाली तर कुठल्याही महिलेवर अत्याचार होऊ देणार नाही अशी संस्था स्थापन केली त्याच दिवशी श्री.निकम यांनी शपथ घेऊन,’बेटी बचाव बेटी पढाव’ मोहीम हाती घेऊन ७ सहकारी मित्रा ना सोबत घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कार्याचा ठसा श्री.निकम यांनी उमटवला आहे.

महिला सबलीकरण असो, वा महिला सक्षमीकरण महिला स्वबळावर कशी लढू शकते, व तिने लढले पाहिजे या साठी नेहमीच अग्रेसर असलेले लक्ष्मण निकम आणि त्यांचे सहकारी लक्ष्मण निकम याना कुठलाही राजकीय वारसा नाही.

राजकारण करायचं नाही केवळ समाजकारण हे ठरवून समाज कार्य करीत असताना ते कुठल्याही राजकीय पक्षाच्या मोहाला बळी न पडता सामाजिक काम करीत राहिले. आपल काम व कार्य इमानदारीने ते निभावले देव पण सर्व काही देतो, हे मनात ठरवलं होतं हेच नियम नेहमी आचरणात आणले. स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी नेहमी पुढे राहून आता पर्यंत ५०० महिला भगिनींचे संसार सुरळीत करून दिले आहेत. मोडणारे संसार वाचवले आहेत.श्री .निकम यांच्या सोबत त्यांच्या धर्म पत्नी सौ. अलका लक्ष्मण निकम यांनी मोलाचा वाटा उचलुन , महिलाच्या मनातील त्रास व अडचनी जाणून घेतात. व
कुठल्याही भगिनीवर अन्याय आत्याचार हाऊ द्यायचा नाही. व
समाज कंटकाला धडा शिकवायचा, असा वसा घेऊन आपण समाजाचे काही तरी देणं लागतो आणि ते आपण समाजातील घटकांना द्यावं आसे ब्रीद वाक्य घेऊन २०२० मधील मार्च महिन्यात कोरोना व्हायरस ने देशभरासह आपल्या नाशिक शहरात देखील धुमाकूळ घातला.रोज शेकडो रुग्ण कोरोना चे सापडत होते.व १० पटीने मृत होत होते.यामुळे संपूर्ण देशात कडक लॉकडाऊन जाहीर केले.यामध्ये नाशिक जिल्ह्या व शहरातील औद्योगिक वसाहती चे चाके थांबली. यामुळे रोजंदारी, कंत्राटी, बांधकाम मंजूर, भिकारी, परराज्यातील परप्रांतीय असे सर्वांचे हाताचे काम गेले.लोक उपाशी राहू लागले. अनेक लोक सामाजिक कार्यकर्ते मदत करीत होते.यामुळे श्री निकम कुटुंब देखील पुढे आले. व सुमारे ११ हजार ७०० कुटुंबापर्यंत ७ दिवस पुरेल इतकं रेशन त्यांनी पोहचवले.

बऱ्याच ठिकाणी जाऊन त्यांनी समाजप्रबोधन नाचे कार्य उत्तम प्रकारे कुठलंही मानधन न घेता करत आहेत. श्री .निकम यांच्या नेतृत्वाखाली रत्नकन्या सेवाभावी संस्था जोमाने समाज कार्य करीत आहे.संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण विठ्ठलराव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कविता रमेश सुसुंदरे उपाध्यक्ष, गौरव चंद्रकांत शहापुरकर सचिव,हरुन अमर शेख खजिनदार, गणेश विठ्ठल निकम सह सचिव,चंदा शरद गरुड सह खजिनदार,लोकेश दिलीप कटारिया विशेष सल्लागार,स्वप्नील लक्ष्मण निकम जनसंपर्कप्रमुख, रमेश बंशी भाग्यवन्त कार्याध्यक्ष, ललिता संतोष शिंदे उपाध्यक्ष, अमित पाटील सचिव,रोशन जाधव जनसंपर्क प्रमुख असे सर्व पदाधिकारी व सदस्य खंबीरपणे संस्थेच्या सामाजिक कार्यात साथ देत आहेत.
+91 92263 50010
मा. श्री. लक्ष्मण विठ्ठलराव निकम रत्नकन्या सेवाभावी संस्था,
संस्थापक अध्यक्ष,सामाजिक कार्यकर्ते
श्री. लक्ष्मण विठ्ठलराव निकम यांचा औद्योगिक क्षेत्रातील वाटचाल :-
स्वप्नील इंटरप्राईजेस ची २००२ नाशिक मध्ये स्थापना करून , नाशिक जिल्ह्यात हॉटेल क किचन उपकरणे, ५० टन क्षमतेचे औद्योगिक क्रेन, जनरल फॅब्रिकेशन कामामध्ये आपली औद्योगिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.श्री निकम कुटुंब ‘ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय’ घेऊन यशस्वी वाटचाल करीत आहेत. शेतकरीराजा साठी १५ ऑगस्ट २०२० पासून शेतीसाठी आवश्यक असलेले सर्व उपकरणे उत्पादन सुरू करून अल्प दरात उत्पादन आणि विक्री आर. एल . ऍग्रो प्रा.लिमिटेड कंपनी सुरू केली आहे. आडगाव येथे त्याचे विक्रीचे दालन देखील सुरू आहे.
