नाशिक मिरर वेबटीम :
मुंबई येथुन शिर्डी कडे साईबाबा चे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या दोन दुचाकी ला सिडकोतील लेखा नगर येथील उड्डानपुलावर अज्ञात ट्रक ने उडविल्याने तीन साई भक्त ठार झाले आहे. तर एकाची तब्येत गंभीर आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात ट्रकचालका वर गुन्हा दाखल केला आहे.मुंबई विलॅपाले येथुन शनिवारी सायंकाळी ६ वाजता १० ते १५ जण दुचाकी वरून शिर्डीला साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी निघाले. विल्होळी नाका कडुन नाशिककडे जातांना सिडकोतील लेखा नगर उड्डान पुल येथे रात्री साडे बाराच्या सुमारास अज्ञात ट्रक ने दुचाकी होडा युनिकान एम एच ०२ एफ डी ४२४८ व होंडा डिवो एम एच ०२ एफ एच ६२६ या दुचाकी ना उडविले. अपघात घडल्या नंतर ट्रक चालक ट्रक घेऊन फरार झाला. या अपघातात य वैजनाथ चव्हाण, सिध्दार्थ भालेराव, आशिष पाटोळे यांच्या अंगावरून ट्रक चे चाक गेल्याने जागीच ठार झाले. तर अनिष वाकळे गंभीर जखमी झाले असुन त्याच्या वर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शना खाली अधिक तपास सुरू आहे.
