नाशिक मिरर : सातपूर परिसरात वाढत्या कोरोना रुग्ण व त्याचे वाढत असलेले मृत्यू संख्येच्या पार्श्वभूमीवर स्वयंस्फूर्तीने सोमवार दि. १९ पासून आठ दिवस जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय सर्वपक्षीय सातपूर मधील पदाधिकारी व नगरसेवक यांनी आयोजित केलेल्या बैठकीत घेतला आहे.
सातपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठया प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडत आहे. सातपूर व नाशिक भागातील सर्व रुग्णालयात जागा उपलब्ध नाही. सातपूर भागांत रोज शेकडो रुग्ण सापडत आहे.वाढत्या कोरोना रुग्ण संख्या पाहता व आणीबाणी परिस्थिती पाहता कोरोना चेन ब्रेक करण्यासाठी हॉटेल अयोध्या येथे सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. नाशिक पश्चिम मतदार संघाच्या आमदार सीमा हिरे,व सातपूर परिसरातील सर्व नगरसेवक, सामाजीक कार्यकर्ते यांनी सोमवार पासून सातपूर भागांत कडक जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय सर्व मिळून घेण्यात आला.
या वेळी जेष्ठ नगरसेवक दिनकर पाटील,सलीम शेख, विलास शिंदे, भगवान आरोटे, शशी जाधव, संतोष गायकवाड, योगेश शेवरे,नगरसेविका माधुरी बोलकर, पल्लवी पाटील,हेमलता कांडेकर, सामाजिक कार्यकर्ते अमोल इघे,राजेश दराडे या सह सातपूर मधील सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.सातपूर करांच्या या निर्णयाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी याना पत्राद्वारे माहीती देण्यात आली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी देखील कर्फ्यु ला सहमती दर्शवली आहे.
