नाशिक मिरर वृत्तसेवा : सातपूर
सातपूर नाशिक शहर खड्डेमय झाले असून सर्व रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.ठिकठिकाणी रस्त्यावरचे डांबर खडी वेगळे होऊन वाहून गेले आहे.संपुर्ण रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे.जनतेच्या करातून पावसाळ्यापूर्वी सहाशे कोटींचे रस्ते बनवले ते मनपा प्रशासनाने चकाचक करून द्यावे अन्यथा नागरिकांच्या वतीने कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा माजी महापौर दशरथ पाटील रस्ते पाहणी दौरात दिला.
माजी महापौर दशरथ पाटील यांनी नाशिकमधील खड्ड्यांबाबत आक्रमकता घेतली असून काल सातपूर विभागाचा पाहणी दौरा केला.या पाहणी दौराची सुरुवात पप्पया नर्सरी येथून करण्यात आली. सातपूर विभागातील सर्व रस्त्यांची अवस्था खुपचं खराब झाली आहे.या खराब रस्त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे सुध्दा कठीण झाले आहे.रस्तावर वाहतूक कोंडी होत आहे.अनेक ठिकाणी खड्ड्यामधील माती व खडी रस्त्यावर पसरल्याने वाहनधारकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.खड्ड्यांमुळे वाहने खिळखिळी होत आहे.त्याबरोबर मानेचे ,कंबरेचे आजार होत आहे.तसेच अनेक वेळा वाहने घसरून छोटे-मोठे अपघात सुध्दा होत आहे.याला जबाबदार मनपा प्रशासन आहे.खड्डे बुजवण्याच्या नावाखाली केवळ त्या खड्ड्यामध्ये माती व कच टाकून बुजवले जात आहे.परंतु काही दिवसांनी तीच माती व कच रस्त्यावर दिसत आहे.व पुन्हा खड्डा तयार होत आहे.
सातपूर विभागात पडलेल्या खड्ड्यांना मनपा प्रशासन तात्पुरते मलमपट्टी करून वेळ मारून नेत आहे.मुख्य रस्त्यावर नागरिकांना खड्ड्याचा सामना करावा लागत आहे. तसेच प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या संदर्भात अनेक वेळा महापालिकेकडे तक्रार करून सुद्धा या कडे दुर्लक्ष होत आहे यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
याठिकाणी झाली पाहणी : – पपया नर्सरी सिग्नल, त्र्यंबकेश्वररोड, श्रीराम चौक,सातपूर -अंबडलिंकरोड,दत्तमंदिर केवल पार्क, सातपूर गाव, नासर्डी नदी पूल, बजरंग नगर,पिंपळगाव बाहुला, विश्वासनगर, राधाकृष्णनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर, ध्रुवनगर, गंगापूर रोड, पाईप लाईन रोड
पप्पया नर्सरी ते अंबड लिंक रोड या मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे. गॅस पाईपलाईन साठी खोदलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण झाले नाही.या रस्तावर नेहमीच वाहतुक कोंडी होत आहे.सांयकाळी रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे.- यशवंत पवार, सामाजिक कार्यकर्ते सातपूर
माजी महापौर दशरथ पाटील यांच्या कार्यकाळात रस्ते झाल्यानंतर नंतर या रस्त्याचे रुंदीकरण झाले नाही.१५ वर्षांनंतरही रस्ते अद्यापही जैसे थे आहे.पावसाळापुर्वी बनवलेल्या रस्त्यांची पुर्ण वाट लागली आहे –
ज्ञानेश्वर पाटील, स्थानिक नागरिक गंगापूर गावश्रमिकनगर रस्त्याच्या दुभाजकाचे काम झाले.पण रस्त्याचे रुंदीकरण झाले नसल्याने नागरिकांना वाहतुक कोंडी चा सामना करावा लागत आहे. – प्रविण आहिरे स्थानिक नागरिक सावरकर नगर

