नाशिक मिरर वृत्तसेवा : देवळा

       कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय देवळा राष्ट्रीय छात्र सेना विभाग आयोजित गुरुवार दिनांक ५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालय, राष्ट्रीय छात्र सेना विभागाने महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपन केले व विद्यार्थ्यांना वृक्ष देण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सटाणा महाविद्यालयातील डॉ. सुनिता शेवाळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर व देवळा एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रोफेसर डॉ. मालती आहेर उपस्थित होत्या यावेळी विद्यार्थ्यांकरिता पर्यावरण विषय जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख व उप प्राचार्य डॉ.डी.के.आहेर यांनी संपूर्ण भारतामध्ये प्लास्टिक मुक्त चळवळ उभी करून प्लास्टिक हे किती आरोग्यास हानिकारक आहे आपण कशा पद्धतीने त्याचा वापर कमी करू या असे प्रयत्न करणं गरजेचं आहे.

काळानुसार आज मानवी गरजा बदलल्या आहेत. प्लास्टिक आज पृथ्वीच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण त्यामुळे यंदाचा पर्यावरण दिन हा प्लास्टिक प्रदूषणाचा अंत या संकल्पनेवर आधारित आहे. पर्यावरणाचे जतन, संवर्धन आणि प्रदूषणाविरोधात जनजागृती निर्माण करणे हा या दिनामागील प्रमुख उद्देश आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या पुढाकाराने १९७२ पासून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. सध्याच्या काळात वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, जंगलतोड, प्लास्टिकचा वापर, वाहतूक व्यवस्था यांमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. यामुळे हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, पाण्याचा तुटवडा, प्रदूषण यांसारख्या गंभीर समस्या उद्भवत आहेत. पर्यावरण दिनाच्या माध्यामातून या समस्यांकडे समाजाचे लक्ष वेधले जाते.

प्लास्टिक हे एक असे पदार्थ आहे जे सहज विघटित होत नाही. त्यामुळे ते माती, पाणी आणि हवेचे प्रदूषण वाढवते. प्लास्टिकचा वापर सोपा आणि स्वस्त असला तरी त्याचे दुष्परिणाम अत्यंत गंभीर आहेत. एकदा वापरलेले प्लास्टिक शेकडो वर्षे विघटित होत नाही. हे प्लास्टिक नद्यांमध्ये, समुद्रात, जंगलात आणि शहरांमध्ये साचते. त्यामुळे प्राणी, पक्षी, मासे यांचा जीव धोक्यात येतो. मायक्रोप्लास्टिक अन्न साखळीत प्रवेश करते आणि मानवी आरोग्यावरही परिणाम करते.

प्लास्टिक प्रदूषण ही जागतिक समस्या असली तरी त्यावर स्थानिक उपाय महत्त्वाचे आहेत. पर्यावरणावर काम करणार्‍या संस्थांच्या प्रयत्नांतून समाजात सकारात्मक बदल घडताना दिसत आहे. मात्र ही लढाई दीर्घकाळ चालणारी असून, प्रत्येक नागरिकाने यात स्वत; आपली भुमिका बजावणे आवश्यक आहे. यासाठी आपण एकदाच वापरून फेकून देणारे प्लास्टिक पूर्णपणे टाळायला हवा. प्लास्टिक पिशव्या, कप, बाटल्या, चमचे यांसारख्या घटकांचा वापर थांबवायला हवा. त्याऐवजी कापडी पिशव्या, स्टीलची भांडी, काचेच्या बाटल्या वापरुन प्लास्टिकचा अंत करण्यास मदत होईल. जे प्लास्टिक वापरले गेले आहे, त्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करून ते पुन्हा वापरण्यायोग्य बनवावे. प्लास्टिकचा अंत हा फक्त पर्यावरणासाठी नाही तर मानवी आरोग्य, भविष्यातील अन्नसुरक्षा आणि जैवविविधतेच्या रक्षणासाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे आपल्या सवयी, विचार आणि कृतीत बदल घडवून आपण प्लास्टिकमुक्त भविष्य घडवू शकतो त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयी जनजागृती ची शपथ डॉ. विलास वाहुळे यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली देण्यात आली.

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.जयवंत भदाणे,राष्ट्रीय छात्रसेना विभाग प्रमुख लेफ्टनंट बादल लाड, डॉ.संजय बनसोडे, प्रा.वामन काकवीपुरे, डॉ. जयमाला चंद्रात्रे, डॉ. राकेश घोडे प्रा.चंद्रकांत दाणी, प्रा.जालिंदर कडू प्रा. रवींद्र पगार, प्रा. यशवंत खैरनार कार्यालयीन अधीक्षक दिनेश वाघमारे महाविद्यालयातील प्राध्यापक व राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!