नाशिक मिरर वेबटीम: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महिला शिक्षण दिन साजरा करत मॉडर्न  शाळा  अशोक नगर मध्ये”ग्रंथ तुमच्या दारी” हा उपक्रम सुरू  करण्यात आला. या वेळेस शाळेला योगेश कमोद, विनायक रानडे , नगरसेविका माधुरी बोलकर, यांनी १०० पुस्तकाची ग्रंथ पेटी भेट देत जयंती साजरी  करण्यात आली. नगरसेविका माधुरी बोलकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर, कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे,उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थी मानसी पाटील  हिने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचरित्र विषयी माहिती  सादर केली.यावेळी शाळेतील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व परिपोषण करणारे महत्त्वाचे साधन म्हणजे स्त्री शिक्षण होय. स्त्रीशिक्षण हा कोणत्याही समाज जीवनाच्या समृद्धीच्या आणि प्रगतीचा मापदंड आहे. ज्या काळात स्त्रीला मानाचे स्थान मिळत नव्हते, शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि गुलाम म्हणून ठेवले जात होते. अशा काळात सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पुणे येथे पहिली शाळा सुरू केली. महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी महत्त्वाची भूूमिका बजावली. त्यांचं कार्याचे स्मरण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. असे प्रतिपादन कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे शिल्पकार विनायक रानडे यांनी केले.
स्त्री शिक्षणाची कवाडे उघडणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारी. आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. त्याच उद्देशाने कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी व विश्वास ग्रुप, जोश फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मॉडर्न हायस्कूल, अशोकनगर, सातपूर येथे ग्रंथपेटी प्रदान करण्यात आली. त्याप्रसंगी विनायक रानडे बोलत होते.
आज विविध क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तुत्वाने आपले स्वतंत्र विश्व निर्माण करून भरारी घेतली आहे. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, अंतराळ प्रवास करणार्‍या कल्पना चावला, एव्हरेस्ट सर करणारी महिला बचेंद्री पाल, ऑस्कर पुरस्कार मिळविणार्‍या भानू अथय्या, आयपीएस अधिकारी किरण बेदी अशा अनेकांची कर्तुत्वाची झेप सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे. असेही रानडे म्हणाले.जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाशी अशी स्त्रीची महती सांगणार्‍या ओळी. तिने प्रत्येकाच्या जगण्याला आकार दिला. आशय दिला. तिच्या या ऋणांचं मोल प्रत्येकजण तिचा सन्मान करून व्यक्त करतो आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्रंथरूपी भेटीतून सावित्रीबाईंच्या कार्याचे स्मरण अधिक ठळक व्हावे या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे मॉडर्न एज्युकेशन सोसायटी चे सचिव विश्र्वास ठाकूर यांनी सांगितले .जोश फाऊंडेशन चे अध्यक्ष योगेश कमोद म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या जीवनाला सन्मान,व सामर्थ्य दिले,तिचे जीवन प्रकाशमान केले .शिक्षण हे प्रकाशाचे प्रतीक आहे त्यातून जीवन प्रेरणा मिळत असते हे संचित प्रत्येकाने जपावे. जिल्हा परिषद नाशिक चे कृषी अधिकारी रमेश शिंदे यांनी ही मनोगत व्यक्त केले त्यांनी सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांच्या शिक्षण विषयक जाणिवांचा विचार यावर भाष्य केले. नगरसेविका माधुरी बोलकर,यांनी अशा कार्यक्रमातून विचारांचा वारसा पुढे नेता येतो असे सांगितले.यावेळी मानसी पाटील हिने मी सावित्रीबाई फुले बोलतेय हे स्वगत सादर केले व पवन धोरण याने सावित्री गीत सादर केले.याप्रसंगी नगरसेविका माधुरी बोलकर,गणेश बोलकर, मुख्याध्यापिका संगीता कासारे, मुक्ता पाठक,ज्योती सोनवणे, नीलांबरी क्षीरसागर, तेजश्री लोणारे ,शिल्पा राव , वर्षा तिवारी , चंदर मिरके,अर्चना सरोदे, श्वेता लोंढे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना पाटील व श्रुती देशमुख यांनी केले.

बातम्या

Don`t copy text!