नाशिक मिरर वृत्तसेवा : सातपूर कॉलनी परिसरात कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याने कॉलनी परिसरातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.नियमनुसार पाणी पुरवठा तीन तास करावा अशी मागणी सातपूर मनपा विभागीय अधिकारी डॉ सुनिता कुमावत यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

 

सातपूर कॉलनी परिसरातील पाणी प्रश्न 2007 पासून प्रलंबीत होता.महापौर व नगरसेवक यांच्या पुढाकाराने सातपूर कॉलनीत अमृतमणी पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली.व त्या टाकीचे पाणी संपूर्ण सातपूर कॉलनी,विनायक संकूल,सावरकर नगर,एकता मित्र मंडळ,जूनी सातपूर कॉलनी यांना तीन तास सकाळी ६ ते ९ वाजेत सोडण्याचा ठराव नाशिक महासभेत झाला. तरीही सातपूर मनपा अधिकारी वर्ग पाणी हे वेळेआधी बंद करुन दुसऱ्या विभागात सोडत आहे. तरी सातपूर कॉलनीच्या हक्काचे पाणी त्यांना पूर्ण वेळ भेटत नाही. अधिकाऱ्यांना विचारले असता ते उडवा उडवीचे उत्तर देत आहे.पाणी नियमा नूसार तीन तास सोडावे अशी तरतूद आहे. मात्र मनपा अधिकारी फक्त अडीच तास सोडतात. त्यामुळे महिला भगिनिचे खूप हाल होत आहेत.तरी विभागीय अधिकारी यांनी या समस्यांकडे लक्ष देऊन समस्या सोडवावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी योगेश लभडे,मिलिंद कांबळे,रुपेश शिरोडे,मनोहर करतकाळ, फिरोज सय्यद, रमेश अहिरे, प्रवीण पटेल, गणेश खिराडकर,लता खिराडकर,उमा जोशी, रुपाली खराटे, अनिता भंगाळे,विकास गिरणारकर,मंगला शिरोडे,उज्वला देशपांडे,रमेश अहिरे,निर्मला गायकवाड,वर्षा लभडे,पूनम चौधरी,योगिता जगताप,सुलताना सय्यद,आदीसह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्यने उपस्थित होते.

 

 

Don`t copy text!