एकूण ५ कोटी च्या निधी मधून डांबरी व सिमेंट रस्ते,ड्रेनेज लाईन, जलवाहिनी कामे पूर्ण
अशोकनगर भाजी मंडई ते चामुंडा नगर पर्यंत रस्ता होणार स्मार्ट ?
नाशिक मिरर वेबटीम : सातपूर मधील प्रभाग क्रमांक १० मधील राधाकृष्णनगर मध्ये तब्बल २० वर्षा नंतर विकास कामे झाली असून परिसरातील नागरिकांनी उशिरा की होईना ! पण झालीत म्हणून समाधान व्यक्त केले आहे. राधाकृष्णनगर परिसर दर पंचवार्षिक निवडणुकीत दुभाजला जातो व दोन प्रभाग रचना मध्ये अडकलेल नगर म्हणून गेल्या २० वर्षा पासून राधाकृष्णनगर, विश्वासनगर, अशोकनगर, चामुंडा नगर,पिंपळगाव बाहुला आदी भागा मध्ये विकास कामा कडे दुर्लक्ष केले जात होते.परंतु हेच नगर एखाद्या नगरसेवकांला निवडून देण्यासाठी किंकमेकर ची भूमिका देखील बजावत होते.त्यामुळे प्रथमच निवडून आलेल्या व प्रभाग सभापती पद भूषवलेल्या नगरसेविका माधुरी गणेश बोलकर यांनी विकास कामात आघाडी घेतली असून एकट्या राधाकृष्णनगर व अशोकनगर, विश्वासनगर भागा मध्ये ५ कोटी रुपये ची कामे पूर्ण केली असून, काही ठिकाणी सुरू आहे.त्याच्या सोबत प्रभागातील जेष्ठ नगरसेविका इंदूबाई सुदाम नागरे, पल्लवी स्वप्नील पाटील व शंशीकात जाधव यांनी चार ही नगरसेवक मिळून आपला नगरसेवक निधी मधून २ कोटी ९५ लाख रुपये डांबरी रस्ते, राधाकृष्णनगर मधील राधाकृष्ण मंदिर परिसरात ७० लाख रुपये निधी मधून सिमेंट रस्ता पावसाळी गटार योजना पूर्ण केली.राधाकृष्णनगर मधील जलकुंभा चे पाणी अशोकनगर , विश्वासनगर भागात पोहचविण्यासाठी नव्याने जलवाहिन्या टाकल्या त्यासाठी एकूण १ कोटी २५ लाख रुपये चा निधी वापरण्यात आला आहे.तर अशोकनगर मधील मुख्य रस्त्यावर ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी ३० लाख रुपये निधी मधून कामे सुरू आहेत.

अशोकनगर भाजी मंडई ते चामुंडा नगर पर्यंत रस्ता होणार स्मार्ट ?
अशोकनगर ते चामुंडा नगर मध्ये नव्याने जलवाहिनी व ड्रेनेज लाईन टाकण्यात आली आहे.त्यामुळे अगोदर चा रस्ता पूर्ण पणे उघडला असून,पुरती चाळण झाली आहे.म्हणून नगरसेविका माधुरी बोलकर यांनी सदर रस्ता सातपूर मधील स्मार्ट रस्ता करण्याचे नियोजन केले असून त्याकामासाठी एकूण ६० लाख रुपये नगरसेवक निधी देण्याची तयारी दर्शवली आहे.तसेच इतर ३ नगरसेवकांशी बोलून सर्वांच्या एकत्रित निधी मधून सदर रस्ता स्मार्ट करण्यात येणार आहे.यामध्ये संपूर्ण रस्ता सिमेंट चा करण्यात येणार आहे.तसेच रस्ता च्या बाजूनं असणारे अतिक्रमण हटवणार आहे.दोन्ही बाजूने पदचारी साठी पेव्हरब्लॉक बसवून फुटपाथ बनवणार आहे. पाणी कनेक्शन, वीज कनेक्शन आदी कामा साठी बनवण्यात आलेला रस्ता पुन्हा फुटू नये यासाठी ठराविक अंतरावर पाईप टाकण्यात येणार आहे.असे माधुरी बोलकर यांनी सांगितले.
राधाकृष्णनगर मधील राधाकृष्णमंदिर परिसरात २० वर्षा पासून रस्ते नव्हते , पावसाचे पाणी थेट घरात घुसत होते.सदर बाब नगरसेवकांच्या नेहमी लक्षात आणून दिली जात होती.त्यामुळे सदर ठिकाणी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पावसाळी गटार टाकून नव्याने सिमेंट रस्ते बनवले आहेत.त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. – रमेश ठुंबरे, स्थानिक नागरिक
