सातपूर : नाशिक मिरर। येथील प्रभाग क्र ११ मधील प्रबुद्धनगर मधील संत रोहिदास चौकातील सार्वजनिक टॉयलेट ची अतिशय दुरवस्था झाली असून, टॉयलेट ची टाकी चा स्लॅब देखील २० ऑक्टोबर रोजी कोसळला. शौचालय चे सगळेच भांडे खराब झाले आहेत.त्यामुळे नागरिक उघड्यावर शौचालयास जात असतात.सध्या कोरोना सारखा भयंकर महामारीत सरकार अनेक उपाय योजना करत असताना प्रबुद्ध नगर सारख्या परिसरात मूलभूत सुविधा चा अभाव निर्माण झाला आहे. परिसरात साफसफाई होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. तसेच शौचालय मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.पाऊस पडत असल्याने महिला वृद्ध व लहान मुलांना शौचालय नसल्याने गैरसोय होत आहे. सदर शौचालय धोकादायक झाले असून ते तोडून त्वरित नवीन बांधावे,तात्पुरती व्यवस्था म्हणून मोबाईल टॉयलेट ची उपाययोजना करण्यात यावी ,अशी मागणी परिसीतील नागरिकांनी केली आहे.याबाबत चे निवेदन मनपा विभागीय अधिकारी व प्रभाग सभापती रवींद्र धिवरे यांना देण्यात आले.यावेळी
माजी नगरसेविका ज्योती शिंदे, सामाजिक कार्यकर्ते बजरंग शिंदे,कैलास सोनवणे, देविदास अहिरे , संतोष जाधव, ज्ञानेश्वर वाटावे,अशोक वाव्हळ, रामदास पालवे, गणेश झनकर, हरीश सोनवणे,
देवराम पगारे, दिनेश गोटे, प्रमोद वाघमारे, रवी मोरे, विठ्ठल साळवे,रमेश जाधव आदी उपस्थित होते.

सातपूर : प्रबुद्धनगर मधील शौचालय व इतर समस्या ची पाहणी करतेवेळी प्रभाग सभापती रवींद्र धिवरे, सामाजिक कार्यकर्ते बजरंग शिंदे, व कैलास सोनवणे, देविदास अहिरे , संतोष जाधव, ज्ञानेश्वर वाटावे परिसरातील नागरिक व महिला

बातम्या

Don`t copy text!