सातपूर विभागातील मनपा अधिकारी व कर्मचारी कामचुकारपणा करत आहेत. अनेकदा निवेदने व लेखी तक्रारी देऊन देखील समस्या सोडवल्या जात नाहीत. यामुळे प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते कल्पेश रमेश कांडेकर यांनी चक्क प्रभाग क्र.९ व १० मध्ये अनेक ठिकाणी चौकात मुख्य ठिकाणी ”आता तरी मनपा प्रशासनाला जाग येईल का? या आशयचे फलक लावले आहेत. हे फलक सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून नागरिक थांबून फलका वरील माहिती वाचत आहे.
#news #nashik #नाशिक #nashikmahanagarpalika #nashikkar
#nashikmirror

Don`t copy text!